आटपाडी-दिघंची राज्यमार्गावरील धांडोरओढ्या वरील पूल दोन्ही बाजूनी खचला ; अजून हि पाण्याचा प्रवाह चालू 

माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी :  आटपाडी शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील सर्वच पूल पाण्याखाली गेले होते. आटपाडी-दिघंची राज्यमार्गावरील धांडोरओढ्या वरील पूल ही पाण्याखाली गेल्याने काल दिनांक १८ रोजी सायंकाळी ७.०० पासून वाहतूक बंद करण्यात आली होती.जोरदार पाउस झाल्याने धांडोरओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. सदर पुलावर अंदाजे ५ ते ६ फुट पाणी होते. प्रचंड पाण्याने नुकताच रस्ता रुंदीकरणामध्ये उंची वाढविण्यात आलेल्या पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पुलाच्या दोन्ही बाजूकडील भराव वाहून गेल्याने दोन्ही बाजूनी पूल खचला आहे.

या ठिकाणी ठेकेदराने तत्काळ काम सुरु केले असले तरी अजून हि धोका कायम असल्याने वाहन धारकांनी आपली वाहने जपून चालविण्याचे आवाहन आटपाडी तालुका युवा सेना प्रमुख संतोष पुजारी यांनी केले आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments