'या’ इयत्तेतल्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु होणार या दिनांकापासून ; वाचा बातमी सविस्तर


 


'या’ इयत्तेतल्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु होणार या दिनांकापासून ; वाचा बातमी सविस्तरमुंबई : विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु तर आहेचं, मात्र शाळा सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नव्हता. परंतु आता 21  सप्टेंबरपासून 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंशत: शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी नववी ते बारावीपर्यंत अंशत: शाळा सुरु करण्यासंदर्भात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) जारी केली आहे. त्यामुळे आता २१ सप्टेंबरपासून शाळा सुरु व्हायला सुरुवात होईल. मात्र शाळा क्लास वेगवेगळ्या वेळात चालतील आणि कोरोनाचे लक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार नाही.
 • नियमावली
  9 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शाळेत येण्याची परवानगी द्यावी लागेल. म्हणजेच शाळेत येणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणार नाही.
  विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांची लेखी परवानगी आणावी लागेल.
  शाळा सुरू करण्यापूर्वी संपूर्ण परिसर, क्लासरूम, लॅब, बॉथरूम सॅनिटाईझ करावे लागेल.
  शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना 6 फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक.
  शाळेत शिकवायला सुरूवात करण्याबरोबरच ऑनलाईन आणि डिस्टंस लर्निंग देखील सुरू राहील.
  कंटेनमेंट झोन बाहेर असलेल्या शांळाच सुरू करण्याची परवानगी.
  50% टिचिंग आणि नॉन टिचिंग स्टाफला ऑनलाईन टिचिंग आणि टेली काउंसिलिंगसाठी शाळेत बोलावले जाऊ शकते.शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना फेस मास्क, हँड सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असेल. स्वच्छता कर्मचाऱ्यांना थर्मल गन, डिस्पोझल पेपर टॉवेल, साबण, 1% सोडिअम हायपोक्लोराईट सॉल्युशन द्यावे लागेल.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post