बाळेवाडीत दोन सख्या जुळ्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू 


 


बाळेवाडीत दोन सख्या जुळ्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू 
माणदेश एक्सप्रेस टीमआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथील दोन सख्या जुळ्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या दुर्देवी घटनेने परीसरातून हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत अधिका माहिती अशी की,बाळेवाडी येथील हैबतराव कोळेकर यांना जुळी मुले होती. जुळे असल्यामुळे त्यांची नावे "लव' आणि "अंकुश' अशी होती. दोघेही चौथी इयत्तेत गेले होते. काल गुरुवारी दिनांक १० रोजी दुपारी बाळेवाडीत माळावर मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले होते. या माळावर माती नाला बांध जागोजागी आहेत. गेल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे त्यामध्ये पाणीसाठा झाला आहे. मेंढ्या चरत आणि खेळत-खेळत तलावाच्या पाण्यात एक जण बुडाला.


 


पाण्याचा अंदाज लागला नाही. पाय गाळात रुतत चालला. त्याला बाहेर काढण्यासाठी दुसरा गेला आणि बघता बघता दोघेही एकाच वेळी पाण्यात बुडाले. पोहता येत नसल्यामुळे दोघांचाही दुर्दैवी अंत झाला. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे लव-अंकुश जोडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे साऱ्या गावावर मोठी शोककळा पसरली आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured