Type Here to Get Search Results !

राज्यातील रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 


राज्यातील रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई : राज्यातील रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यामुळे देशातील सर्वच व्यवहार आणि उद्योगधंदे ठप्प झाले होते. अशातच गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील रेस्टॉरंट्सही बंद आहेत.


 


भारतात राष्ट्रव्यापी अनलॉकचा चौथा टप्पा ३० सप्टेंबरला संपून जाईल. एक सप्टेंबरला सुरू झालेल्या अनलॉक ४.० मध्ये केंद्र सरकारने पहिल्यांदा मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यासोबतच इतर विविध ठिकाणी सूट दिली हती. यासोबतच नववी ते १२ वी पर्यंतच्या शाळा अंशत: सुरू करण्यात आल्या. दरम्यान, आज केंद्रीय गृह मंत्रालय अनलॉक ५.० बाबतच्या गाईडलाईन्स जाहीर करू शकते.राज्य शासनाने माझे कुटुंब- माझी जबाबदारी हे अभियान राबवण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अवघा महाराष्ट्र माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे, तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे, असे ठाकरे म्हणाले.



कोव्हिडमुळे कोरोना योद्धेही बाधित झाले आहेत, दुर्दैवाने काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करु, ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेवून सुरु करत आहोत. त्या दृष्टीने रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ती त्यांना अडचणीत आणण्यासाठी नक्कीच नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
सध्या संपूर्ण देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आणि अनलॉकमध्ये काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्या. लॉकडाऊनला सहा महिने पूर्ण झाले आहेत. अशातच अजूनही राज्यात अनेक गोष्टी बंद आहेत. त्यापैकी एक म्हणजे, रेस्टॉरंट्स.



सध्या सण-उत्सव आणि पावसाचे दिवस आहेत. गर्दी होत आहे. लोकांचा संयम हाही महत्त्वाचा विषय आहे. पण कोरोनासोबत जगताना आता प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. मास्क लावणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करताना या तिन्ही गोष्टीची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणाऱ्या आणि इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसिपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचेही सांगताना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेऊन यात सहभागी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्त्वे अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies