टेंभू योजनेत आटपाडी तालुक्यातील वंचित गावांचा समावेश करा : प्रा एन.पी.खरजे यांची पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी 

माणदेश एक्सप्रेस न्युज

निंबवडे/राघव मेटकरी : आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेत तालुक्यातील वंचित गावांचा समावेश करण्याची मागणी प्रा.एन.पी.खरजे, हिंदूराव (शेठ) थोरात, राघव मेटकरी, तानाजी खरजे, वैभव पावणे, सुखदेव खताळ, सागर पाटील, आण्णासाहेब मोटे, हणमंत थोरात व शिष्टमंडळ यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

आटपाडी तालुक्यातील पश्चिमेकडील विभूतवाडी, कुरूंदवाडी, पिंपरी, गुळेवाडी तसेच आटपाडी पुर्वेकडील काही गावे टेंभू योजनेपासून वंचित राहिलेली आहेत. या भागातील शेतकरी  व कष्टकरी बांधवांचा विचार करून पाणीप्रश्न कायमचा मिटवावा व शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तर टेंभू योजनेतील या वंचित गावांना नक्कीच पाणी मिळेल असा विश्वास निवेदनकर्त्यांना पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments