आटपाडी येथे माय-लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू 


 


आटपाडी येथे माय-लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू 
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : माय-लेकाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आटपाडी जि.सांगली येथील सोमेश्वरनगर येथे घडल्याने परीसरातून हळहळ व्यक्त होत आहे.आटपाडी येथील सोमेश्वर नगर येथील रहिवाशी असणाऱ्या राणी चंद्रकांत पारसे (वय वर्षे 30) ह्या मुलगा पृथ्वीराज उर्फ दादा चंद्रकांत पारसे (वय वर्षे १०) याला सोबत घेवून शुक्र ओढ्याला कपडे धुण्यासाठी आज सकाळी ११.०० च्या दरम्यान गेल्या होत्या. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने पृथ्वीराज उर्फ दादा चंद्रकांत पारसे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जावू लागला. त्याचा वाचविण्यासाठी त्याही पाण्यात गेल्या. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने व प्रवाह जास्त असल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले.घटनास्थळी आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी पंकज शेळके, आटपाडीच्या सरपंच सौ.वृषाली पाटील, ॲड. धनंजय पाटील, ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मरगळे, सर्जेराव राक्षे, दत्तात्रय पाटील (पंच), गाव कामगार तलाठी सुधाकर केंगार यांनी भेट देऊन मदतकार्य सुरू केले होते. दोघांचे मृत्यूदेह सापडत नसल्याने सांगलीहून बोट मागविण्यात आली होती. परंतु स्थानिकांनी याचा शोध घेत त्यांचे मृतदेह बाहेर काढल्याने बोट रद्द करण्यात आली. आकस्मिक घटना घडल्यामुळे शासनातर्फे मदत मिळणे कामी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहेत. पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे नागरिकांनी ओढा पात्रात  जाऊ नये, काळजी घ्यावी असा सतर्कतेचा इशारा नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तथा आटपाडीच्या सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी दिला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured