मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या घराबाहेर जाउन ढोल वाजवणार : गोपीचंद पडळकर 

मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या घराबाहेर जाउन ढोल वाजवणार : गोपीचंद पडळकर 

 मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या घराबाहेर जाउन ढोल वाजवणार : गोपीचंद पडळकर पंढरपूर : धनगर आरक्षणासाठी आजसकाळपासून विविध जिल्ह्यात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. पंढरपुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्त्वाखाली हुतात्मा चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘ढोल बजाओ’ आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला.धनगर समाज आरक्षणप्रश्नी गंभीर झाला असून राज्यभरात आज ढोल बजाओ आंदोलन करीत आहेत. या आंदोलनातून राज्यसरकारला आरक्षण प्रश्नावर गंभीर होण्याच्या इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपा आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.या आंदोलनानंतर बोलताना पडळकर सरकारला इशारा देताना म्हणाले कि, धनगर समाज आज शांततेने आंदोलन करतोय. जर त्यांच्या भावनांचा विचार केला गेला नाही, तर मंत्र्यांच्या बंगल्यांसमोर आंदोलन करु. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकबाहेर मी स्वत: जाऊन ढोल वाजवणार असल्याचे ते म्हणाले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments