पालकमंत्री जयंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली जिल्ह्यासाठी प्राप्त व्हेंटिलेटर कार्यान्वित


 


पालकमंत्री जयंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली जिल्ह्यासाठी प्राप्त व्हेंटिलेटर कार्यान्वित
माणदेश एक्सप्रेस न्युज



सांगली :  संपूर्ण देशभर व सांगली जिल्ह्यातही कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटरची कमतरता पडत होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाभर दौरा करून शहरी व ग्रामीण भागात रूग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधांची माहिती घेऊन शहरी भागातील रूग्णांबरोबरच ग्रामीण भागातील रूग्णांनाही दिलासा मिळण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय रूग्णालयांबरोबरच खाजगी कोविड हॉस्पीटलना व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासित केले होते.


 


त्यानुसार पालकमंत्री जयंत पाटील यांनी विशेष प्रयत्न करून ठाणे, धुळे, वर्धा, मुंबई महानगरपालिका, पीएम केअर, नारायण हॉस्पीटल बेंगलुरू, टाटा ट्रस्ट आदि विविध ठिकाणी सातत्याने संपर्क व पाठपुरावा करून सांगली जिल्ह्यासाठी 74 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. या व्हेंटिलेटरचे जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी कोविड हॉस्पीटलना वाटप करण्यात आले असून ते कार्यान्वित करण्यात येत आहेत. 


 



ग्रामीण भागातील ज्या रूग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे, अशा रूग्णांना तालुकास्तरावरील शासकीय व खाजगी कोविड हॉस्पीटलमध्ये व्हेंटिलेटर बेडच्या कमतरतेमुळे सांगली, मिरज च्या ठिकाणी यावे लागत होते. अशावेळी दूरच्या ठिकाणाहून येणाऱ्या रूग्णांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय व खाजगी कोविड रूग्णालयाबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, खाजगी कोविड हॉस्पीटल यांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याने रूग्णांना दिलासा मिळणार आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured