आटपाडी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशासनाला निवेदन 


आटपाडी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशासनाला निवेदन 
माणदेश एक्सप्रेस आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई देण्याची मागणी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेच्या वतीने करण्यात आली असून याबाबत संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.आटपाडी तालुक्यामध्ये दिनांक ६ रोजी झालेल्या पावसाने वादळी वाऱ्यासह बाजरी, मका, डाळिंब, द्राक्ष या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


 


सदरच्या मागणी निवेदन नायब तहसीलदार रवींद्र तोडकर व तालुका कृषी अधिकारी पी.पी. पाटील यांना देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आटपाडी तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड, वसंत माळी, उत्तम गळवे, जनार्दन गळवे, संजय साळुंखे, आदी शेतकरी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured