Type Here to Get Search Results !

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते विशाल आनंद यांचे निधन


 


बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते विशाल आनंद यांचे निधन



मुंबई : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते विशाल आनंद यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 4ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘चलते चलते’ या यादगार सिनेमात दमदार भूमिका साकारणारे विशाल आनंद यांचे खरे नाव भीष्म कोहली आहे.  बॉलिवूडच्या 11 चित्रपटांमध्ये त्यांनी यादगार भूमिका साकारल्या. निर्माते- दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख होती. 


 


आपल्या ॲक्टिंग करिअरमध्ये विशाल आनंद यांनी अशोक कुमार, सिमी ग्रेवाल, मेहमूद अशा अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले. चलते चलते, सारे गामा, दिल से मिले दिल आणि टॅक्सी ड्राइव्हर  हे विशाल आनंद यांचे काही यादगार सिनेमे. त्यांचा ‘चलते चलते’ हा सिनेमा विशेष गाजला. यात त्यांनी सिमी ग्रेवालसोबत काम केले. या चित्रपटाचे ते निर्माते देखील होते.विशाल आनंद यांना म्युझिक डायरेक्टर बप्पी लहरी यांच्या यशाचे श्रेय दिले जाते. कारण विशाल आनंद यांनीच बप्पी दा यांना पहिला मोठा ब्रेक दिला होता.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies