आटपाडीत बजाज कार्यालयात विनाकारण तोडफोड ; आरोपी विरुद्ध पोलीस ठाणेत गुन्हा दाखल 


 


आटपाडीत बजाज कार्यालयात विनाकारण तोडफोड ; आरोपी विरुद्ध पोलीस ठाणेत गुन्हा दाखल 
माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील विद्यानगर परिसरारात असणाऱ्या बजाज फायनान्स ऑफिसमध्ये दारू पिवून मला मोबाईल पाहिजे म्हणून ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाणे येथे फिर्यादी प्रेमकुमार मोरे यांनी आरोपी संतोष ऐवळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी शहरातील विद्यानगर परीसरात बजाज फायनान्सचे ऑफिस आहे. त्याच्या बाजूला डीटीडीसी कुरिअरचे ऑफिस आहे. फिर्यादी प्रेमकुमार अमृत मोरे हे बजाज फायनान्स आटपाडी येथे खाजगी नोकरीस आहेत. दिनांक ८ च्या सांयकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी संतोष ऐवळे त्याठिकाणी आला व शेजारील असणाऱ्या डीटीडीसी कुरिअर ऑफिस मध्ये जावून सुजाता नितीन वाघमोरे यांना मोबाइलची मागणी करू लागला यावेळी त्यांनी आरोपी संतोष ऐवळे यास त्यांच्या शेजारील असणाऱ्या असणाऱ्या बजाज फायनान्स ऑफिसमध्ये जाण्यास सांगितलेवर त्यांना शिवीगाळी करून तो तो बजाज फायनान्सच्या ऑफिसमध्ये आला. फायनान्सवर मला मोबाइल विकत घ्यावयाचे आहे असे सांगत त्याने तेथील असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळी करुन मारहाण केली व त्याच्याजवळील ब्लेडने त्याचे हातावर मारुन घेवुन जखमी होवुन ऑफिस बाहेर जावुन तेथे असलेल्या फरशीच्या तुकड्याने ऑफिसच्या काचेवर फेकुन मारुन काच फोडुन ऑफिसचे अंदाजे ४० ते ४५ हजार रुपयांचे त्याने नुकसान केले आहे. 
याबाबत आरोपी संतोष ऐवळे याच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाणे येथे भा.दं.स.कलम ४५२, ३२३. ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हेकॉ गणपत गावडे हे अधिक तपास करीत आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured