विद्यार्थ्यांची कोणत्याही दडपणाशिवाय परीक्षा घ्या : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

विद्यार्थ्यांची कोणत्याही दडपणाशिवाय परीक्षा घ्या : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत


 


विद्यार्थ्यांची कोणत्याही दडपणाशिवाय परीक्षा घ्या : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत


 कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी शुक्रवारी शिवाजी विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा प्रशासनाकडून आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले, शिवाजी विद्यापीठाची अंतिम वर्ष परीक्षांची तयारी पूर्ण झाली असून यासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य राहील. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे दडपण येऊ नये, अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात. मुंबईसह अन्य ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेताना आलेल्या अडचणी शिवाजी विद्यापीठास येऊ नयेत, यासाठी पर्याय शोधावेत, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवाजी विद्यापीठ प्रशासनास दिल्या. 


 सीमाभागात सुरू करण्यात येणार्याा शैक्षणिक संकुलात जानेवारी 202 पासून नवीन कोर्सेस सुरू केले जाणार आहे. महाविद्यालये सध्या तातडीने सुरू करण्याची परिस्थिती महाराष्ट्रात नाही. कोव्हिडचे प्रमाण कमी झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सुरू करण्याचा प्रयत्न राहील, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले. अंतिम वर्षाची परीक्षा देणार्या् विद्यार्थ्यांची संख्या 74 हजार आहे. 50 हजार 417 विद्यार्थी ऑनलाईन, 22 हजार ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत.विद्यार्थ्यांची संख्या 34 हजार 599 असून विद्यार्थिनी 39 हजार 415 व दिव्यांग 200 विद्यार्थी आहेत.
 सीमा भागातील शैक्षणिक संकुल स्थापन करण्याबाबतचा आढावा घेतला. चंदगडमधील शिनोळी व तुडये दरम्यानच्या दोन जागा निश्चिकत करण्यात आल्या आहेत.एका खासगी कंपनीची जागा असून त्यांच्याबरोबर सामंजस्य करार केला जाणार आहे. त्याच परिसरातील आवश्यक दहा एकर जागा जिल्हाधिकारी यांनी शोधून काढली असून लवकरात-लवकर ती जागा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सीमा भागात जानेवारी 2021 पासून नवीन कोर्सेस सुरू केले जाणार आहेत. सीमा भागात महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात येणारे शैक्षणिक संकुल भव्य असेल. त्याचा निधी गोळा करण्याचे आश्वाभसनही त्यांनी दिले.मुंबई विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्या दोन दिवस 18 हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना पाच लाखांपेक्षा लोकांनी हे पेज ओपन करण्याचा प्रयत्न केला.


 


 


पोलिसांनी चेन्नरईच्या कंपनीचे दोन दिवसांत ऑडिट करून अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. परीक्षा काळात कोरोना पॉझिटिव्ह असलेले विद्यार्थी व तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा परत घेतल्या जाणार आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा तातडीने घेण्याच्या सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची शासन काळजी घेईल, असे आश्वाणसन मंत्री सामंत यांनी दिले.  ग्रंथालये सुरू करण्याबाबत आठ दिवसांपूर्वी तत्वत: निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार लवकरच ग्रंथालये सुरू केली जाणार आहेत. चार दिवसांत त्याचा प्रोटोकॉल तयार केला जाणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.


 कोल्हापूर विभागीय सहसंचालक कार्यालयात प्रशासनाधिकारी व सहसंचालक यांच्यात ताळमेळ नाही. प्रकरणे मार्गी लावण्यासाठी पैशांची मागणी केली जाते, असा प्रश्नं उपस्थित करण्यात आला. संबंधित अधिकार्यावविरोधात लेखी तक्रार येऊन ती सिद्ध झाल्यास तत्काळ कारवाई करू, असा इशारा मंत्री सामंत यांनी दिला आहे. ज्या शिक्षण संस्था जबरदस्तीने विद्यार्थ्यांकडून फी वसूल करण्याचा प्रयत्न करीत असतील, यासंदर्भात उच्चशिक्षण सहसंचालक, कुलगुरू यांच्याकडे तक्रार दाखल करावी. त्याची तत्काळ दखल घेतली जाईल. शिक्षण संस्थांनी शैक्षणिक फी टप्प्याटप्प्याने घ्यावी. यावर्षी एकही रुपयाची फी वाढ करू नये, हा निर्णय झाला आहे, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments