राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होम क्वारंटाईन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होम क्वारंटाईन


 


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होम क्वारंटाईन


 


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याने त्यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त खबरदारी घेताना पाहिले आहे. मात्र, त्यांना आता लक्षण जाणवू लागली असून त्यांची तातडीने कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण थोडा ताप थंडी सारखी लक्षणे असल्याने अजित पवार यांनी सार्वाजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.


 


अजित पवार यांना सौम्य लक्षणं असून मुंबईमधील घरात ते क्वारंटाइन झाले आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या सर्व बैठका तसंच सकाळी होणारा जनता दरबार रद्द करण्यात आला होता. यावेळी कोणतंही कारण सांगण्यात आलं नव्हतं. नमुने चाचणीसाठी पाठवले असता अजित पवार यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments