मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? : अमृता फडणवीस

मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? : अमृता फडणवीस


 


मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? : अमृता फडणवीसमुंबई : मंदिरे उघडण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वादंग सुरू झाले असतानाच या वादात वाढ म्हणून आता माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्र्यांना खिजविले आहे. त्यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदुत्वाची आठवण करून देत बार, रेस्टॉरंट सुरू झाले, देवच कुलूप बंद का? मंदिरे सुरू करू नयेत असे दैवी संकेत मिळतात का? असा सवाल राज्यपालांनी ठाकरेंना खरमरीत पत्र लिहित केला. त्यांच्या या पत्राला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी 'माझ्या हिंदुत्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हटले. या वादावर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत '''वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकाने सगळीकडे सुरू झाली आहेत आणि मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? असा सवाल उपस्थित केला. तसेच, काही विचित्र लोकांकडे कधी विवेकी असल्याचे सिद्ध करणारे प्रमाणपत्र मागावेसे वाटते. अशा खोचक शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments