Type Here to Get Search Results !

1 नोव्हेंबरपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीबाबत नवीन सिस्टम लागू होणार


 


1 नोव्हेंबरपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीबाबत नवीन सिस्टम लागू होणार


 


नवी दिल्ली : 1 नोव्हेंबरपासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. सामान्यांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या डिलिव्हरी सिस्टमपासून (LPG Cylinder Home Delivery) घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीचा समावेश आहे. या सर्व गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. एक तारखेपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीबाबत नवीन सिस्टम लागू होणार आहे. ज्यामध्ये तुम्ही ओटीपीशिवाय सिलेंडर घेऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे इंडेन गॅसने त्यांचा सिलेंडर बुकिंग क्रमांक देखील बदलला आहे. 



सिलेंडरची डिलिव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. या नवीन प्रणालीला DAC असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code). आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल.



डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल. तेल कंपन्या हा प्रयोग सुरुवातीला 100 स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल



ओटीपी सिस्टम लागू झाल्यानंतर ग्राहकांकडे एलीपीजी डिलिव्हरी घेताना त्यांचा मोबाइल असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्यामधील मोबाइल क्रमांक अपडेटेड असणेही अनिवार्य आहे. जर एखाद्या ग्राहकाने त्याचा मोबाइल नंबर डिस्ट्रिब्युटरकडे अपडेट केला नसेल, तर डिलिव्हरी बॉयकडे याबाबतचे एक App असेल. ज्या माध्यमातून तुम्ही त्या क्षणीच तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करू शकता आणि ज्यानंतर कोड मिळेल. ज्या ग्राहकांचा पत्ता किंवा मोबाइल क्रमांक चुकीचा आहे, अशांना समस्या निर्माण होऊ शकते. या कारणांमुळे त्यांच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते. हा नियम कर्मशिअल एलीपीजी सिलेंडरसाठी लागू होत नाही आहे.



तुम्ही जर इंडेनचे ग्राहक असाल तर तुम्ही जुन्या क्रमांकावरून आता एलपीजी गॅसचे बुकिंग करू शकणार नाही. इंडेनने त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर बुकिंगचा नवा क्रमांक पाठवला आहे.याआधी इंडियन ऑइलने अशी माहिती दिली होती की, घरगुती गॅस बुकिंगसाठी देशात वेगवेगळ्या सर्कलसाठी वेगवेगळे मोबाइल क्रमांक आहेत. आता देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीने सर्वांसाठी एकच नंबर जारी केला आहे. इंडेनच्या देशभरातील ग्राहकांसाठी एलपीजी बुक करण्यासाठी 7718955555 या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करावा लागेल.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies