राजेवाडी-काळामळा ते ढोलेमळा रस्त्याचे होणार डांबरीकरण : 1 कोटी 73 लाख रुपये मंजूर 

राजेवाडी-काळामळा ते ढोलेमळा रस्त्याचे होणार डांबरीकरण : 1 कोटी 73 लाख रुपये मंजूर 


 


राजेवाडी-काळामळा ते ढोलेमळा रस्त्याचे होणार डांबरीकरण : 1 कोटी 73 लाख रुपये मंजूर 
माणदेश एक्सप्रेस टीम 


 आटपाडी/धिरज प्रक्षाळे : गेली अनेक वर्षांपासून मागणी होत असलेला ढोलेमळा ते राजेवाडी-काळामळा या रस्त्यासाठी तब्बल 1 कोटी 73 लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला असून त्याबाबतच्या निविदा निघाल्याची माहिती दिघंचीचे सरपंच अमोल मोरे यांनी दिली.


 सरपंच अमोल मोरे म्हणाले, सदर रस्त्याबाबत आमदार अनिलभाऊ बाबर व तानाजीराव पाटील यांच्याकडे नागरिकांनी कैफियत मांडली होती. वेळोवेळी मागणी करून देखील रस्त्याबाबत राजकीय उदासीनता होती. परंतु आमदार अनिलभाऊ बाबर आणि तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नांनी या रस्त्यासाठी तब्बल 1 कोटी 73 लाख एवढा भरीव निधी उपलब्ध झाला असून या रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. सदर रस्त्यासाठी विकास मोरे, मारुतीदादा भोसले, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब होनराव, सागर ढोले, मुन्नाभाई तांबोळी यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न करून पाठपुरावा केला.
यापुर्वी देखील दिघंची-ढोलेमळा रस्त्यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर आणि तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नांनी 2 कोटी 79 लाख एवढा निधी मंजूर होऊन अनेक वर्षांपासून मागणी असलेला रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. दळणवळणासाठी तसेच शेतकरी बांधव व नागरिकांना भागातील रस्ते व्यवस्थित असणे ही काळाची गरज आहे. ढोलेमळा व राजेवाडी-काळामळा येथील नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न निकालात निघाल्याने आमदार अनिलभाऊ बाबर आणि तानाजीराव पाटील यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments