Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यातील नागरिकांनी अतिवृष्टी कालावधीत दक्षता घ्यावी : तहसीलदार सचिन लंगुटे ; आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी 1077 टोल फ्री 


 


आटपाडी तालुक्यातील नागरिकांनी अतिवृष्टी कालावधीत दक्षता घ्यावी : तहसीलदार सचिन लंगुटे ; आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी 1077 टोल फ्री 


 


सांगली : दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून महाराष्ट्रामध्ये अत्यंत मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आज होणाऱ्या या अतिवृष्टीच्या कालावधीत सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने आटपाडीचे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी आटपाडी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.


 


आंध्रप्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा हा तेलंगणा राज्यातील खम्माम व आंध्रप्रदेश येथील काकीनाडा किनारपट्टीवर प्रवेश करणार आहे. या परिस्थितीमुळे आज दि. 14 ऑक्टोबर रोजी अत्यंत मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 


 


मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पाऊस पडत असताना, विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रीक वस्तूपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी 1077 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधावा. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सुत्राकडून करून घ्यावी. अतिवृष्टी होत असताना कोणीही नदी नाला इत्यादी ठिकाणी प्रवेश करू नये. पूराच्या पाण्यात नागरिकांनी सेल्फी काढू नये. इ. सूचना ही देण्यात आलेल्या आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies