15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी : मात्र, थिएटरमध्ये 50 टक्केचं प्रेक्षकांना परवानगी


 


15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी : मात्र, थिएटरमध्ये 50 टक्केचं प्रेक्षकांना परवानगी


 


नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 5 अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.) अनलॉक पाचमध्ये 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली आहे. मात्र, थिएटरमध्ये 50 टक्केचं प्रेक्षकांना परवानगी असणार आहे. मार्च महिन्यापासून शाळा, चित्रपटगृह बंद आहेत. आता त्यांना उघडण्यास परवानगी दिली  आहे. दरम्यान, आज चित्रपटगृह सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.


 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या लागू केल्यापासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. केंद्र सरकारतर्फे चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती देता येणार आहे. सिनेमा, थेटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured