आता रिलायन्स  कंपनी बनवणार  कोविड-19 वरील लस

आता रिलायन्स  कंपनी बनवणार  कोविड-19 वरील लस


 


आता रिलायन्स  कंपनी बनवणार  कोविड-19 वरील लस


 


नवी दिल्ली -  जगासह देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशात भारतातील सहा कंपन्या कोविड-19 वरील लस निर्माण करण्याच्या कामात गुंतल्या आहेत. आता यामध्ये रिलायन्स लाईफ साइंसेस या कंपनीचाही समावेश झाला आहे. रिलायन्ससह सहा कंपन्यांना कोरोनावरील लस निर्माण करण्यासाठी रेगुलेटरी अप्रुव्हल मिळाले आहे. भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जायडस कॅडिला या कंपन्या लशीचे ट्रायल घेत आहेत. पुढील वर्षाच्या तिमाहीमध्ये कोणत्यातरी दोन लशी तयार होतील, अशी सरकारला आशा आहे. 


 


जगभरात सध्या 160 पेक्षा अधिक कंपन्या कोरोनावरील लस बनवण्याचे काम करत आहेत. यातील पुढील काही लशी प्रगतीपथावर आहेत. 


ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनकाची लस- दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये 
मॉडर्नाची लस-  तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये
फाइजरची लस- - दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये
चीनच्या साइनोफार्म, साइनोवॅक आणि कॅनासिनो बायोलॉजिक्लची लस- तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये


भारतात विकसित होणाऱ्या लशी :  कोविशील्ड (ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनका) - दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये,
कोवॅक्सिन- दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये,  जायकोव-डी- दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये


 


मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मालकीची एक कंपनी कोविड लस विकसित करत आहे. या महिन्यापासून लशीच्या प्राण्यांवरील चाचण्या सुरु होतील. रिलायन्स रीकॉम्बिनेट प्रोटीन बेस्ट लस बनवत आहे. 2021 च्या पहिल्या तीन महिन्यात कंपनी मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात पोहोचण्याची शक्यता आहे. 


 


चीनने लस निर्मितीमध्ये मोठी प्रगती केली आहे.  चीनच्या तीन लशी मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. चीनने हजारो नागरिकांना कोरोना लशीचा डोस दिला आहे. चीन ही लस अन्य देशांनाही देऊ इच्छित आहे. मात्र, चीनच्या लशीवर तत्ज्ञांकडून अविश्वास व्यक्त केला जात आहे.


 


दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून World Health Organization (WHO) कोरोना लशीसंबंधी मंगळवारी मोठं वक्तव्य आलं. कोरोनावरील लस या वर्षीच्या शेवटपर्यंत उपलब्ध होण्याची आशा आहे, असं सकारात्मक वक्तव्य WHO प्रमुख टेड्रोस घेब्रेयसेस यांनी केलंय. 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments