दिलासादायक ; 2021 फेब्रुवारीपर्यंत देशात कोरोनावर नियंत्रण

दिलासादायक ; 2021 फेब्रुवारीपर्यंत देशात कोरोनावर नियंत्रण


 


दिलासादायक ; 2021 फेब्रुवारीपर्यंत देशात कोरोनावर नियंत्रण नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना  संक्रमणाची प्रकरणं कमी झाली आहेत. त्याचबरोबर मृतांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून येत आहे. बहुतेक राज्यांत संक्रमणाचा प्रसार थांबला आहे पण एनआयटीआय आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल हिवाळ्याच्या मोसमात  संसर्ग होण्याची शक्यता नाकारत नाही. मात्र, ते असेही म्हणतात की मार्गदर्शक तत्त्वे अवलंबली गेली तर 2021 फेब्रुवारीपर्यंत देशात कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
 देशातील साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी तसेच समन्वय साधण्यासाठी पॉल हे तज्ज्ञ पॅनेलचे प्रमुख देखील आहेत. ते म्हणाले की कोव्हिड-19ची लस एकदा आली की नागरिकांना पुरविण्यासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी प्रथमच कबूल केले की कोव्हिड-19 भारतात समुदायिक पातळीवर पसरत आहे. कोरोना आता केवळ काही जिल्हे आणि राज्यांपुरते मर्यादित आहे.
 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments