कोरोनाचा कहर ; गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 70,496 नवे रुग्ण

कोरोनाचा कहर ; गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 70,496 नवे रुग्ण


 


कोरोनाचा कहर ; गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 70,496 नवे रुग्णनवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल तीन कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 70,496 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 964 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 69,06,152 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,06,490 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी (9 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 70 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 69 लाखांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments