ऊसतोड कामगारांच्या कष्टाला योग्य भाव मिळालाच पाहिजे : आमदार गोपीचंद पडळकर ; योग्य मजुरी मिळाल्याशिवाय कोयता हातात घेवू नका ; वळईत बैठक संपन्न 

ऊसतोड कामगारांच्या कष्टाला योग्य भाव मिळालाच पाहिजे : आमदार गोपीचंद पडळकर ; योग्य मजुरी मिळाल्याशिवाय कोयता हातात घेवू नका ; वळईत बैठक संपन्न 


ऊसतोड कामगारांच्या कष्टाला योग्य भाव मिळालाच पाहिजे : आमदार गोपीचंद पडळकर ; योग्य मजुरी मिळाल्याशिवाय कोयता हातात घेवू नका ; वळईत बैठक संपन्न 
माणदेश एक्सप्रेस टीम म्हसवड/अहमद मुल्ला : ऊस तोडणीचा व सर्वांचाच दर वाढल्या शिवाय ऊस तोड कामगारांना कोयता हातात घेऊ नये असे आवाहन भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. वळई (ता.माण) येथे माण तालुक्यातील ऊस तोड मजुर, मुकादम व वाहतुक कंञाटदार यांच्या महत्वपुर्ण बैठकीत आमदार पडळकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, साखर कारखान्यांनी ऊस तोडणीसह इतर सर्वांचाच दर वाढल्या शिवाय कोयता हातात घ्यायचा नाही. सर्वांपेक्षा जास्त कष्ट हे ऊसतोड मजुर करत असतात. कितीही काम केले तरी त्यांच्या प्राथमिक गरजाही पुर्ण होत नाहीत. सध्याच्या या कोरोना सदृष्य परिस्थितीत ऊस तोड मजुरांचे जास्तच हाल होतील त्यासाठी प्रत्येक कारखान्यावर सर्व सोयीसुविधा असणारे कोव्हिड हॉस्पीटल उभारल्या शिवाय कारखान्यावरच ऊस तोडणी कामगारांनी जावूच नये.मजुरांना क्वारंनटाइन केल्यास त्यांचा पंधरा दिवसाचा पगार कारखान्याने दिला पाहिजे. महिला मजुरासांठी प्रत्येक  कारखान्याने शोचालयाची सुविधा केल्या शिवाय कामास जाताना वाहनात साहित्य भरु नये. ऊसतोड मजुरांचा दर १५ टक्के, मुकादमाचे कमीशन १८.५ टक्के वरुन ३७ टक्के व वाहतुकीचा दर ५० टक्के वाढलाच पाहिजे अशी मागणीही आमदार पडळकर यांनी केली. याबरोबरच विविध ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नासह इतर समस्यावर त्यांनी रोखठोक बोलुन प्रसंगी भावनिक करुन या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व ऊस तोडणीसह इतर मजुरांचीही मने जिंकली.यावेळी भाजपाचे माण तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे म्हणाले की, स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्यानतंर ऊस तोडी मजुरासाठी झटणारा नेता म्हणजेच आमदार गोपीचंद पडळकर हेच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोडणीसह इतर सर्व कामगारांना एकञ येण्याची, एकीने राहण्याची संघटना निर्माण करण्यास गरज असुन आपली संघटना मजबुत असेल तरच आपल्याला न्याय मिळेल असा दावाही त्यांनी केला.कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात लोणारी युवा प्रतीष्टानचे अध्यक्ष दैवत काळेल यांनी ऊस तोड मजुरांची कथा आणि व्यथा मार्मीक शब्दात उपस्थितांसमोर मांडल्या. ऊस तोड कामगारांना सन्मानपुर्व वागणुक शेतकऱ्याकडुन मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऊस तोडणी मजुरासाठी जो लढा दिला आहे. त्याला हवी तेथे साथ देण्याचे आश्वासनही देवून सर्व ऊसतोड मजुरांनी दर वाढल्या शिवाय घर सोडूच नये असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.यावेळी भाजपाचे बाळासाहेब मासाळ, दत्ता शिंदे, भोजराज काळेल, दादा आटपाडकर, सजंय शिंदे, विश्वास काळेल, चंदु काळेल, शकंर काळेल, मयुर काळेल, भारत काळेल, बाजीराव काळेल, ज्ञानेश्वर नरळे, नवनाथ शिंदे, बापु आटपाडकर, शुभम शिंदे तसेच ऊस तोडणी मुकादम व कामगार उपस्थित होते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments