पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल


 


पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल 
अमळनेर :  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राज्यसभा खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकरांसह पन्नास जणांविरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात जिल्हाधिकार्यां च्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेऊन गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.


 


 मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन घेण्याचं योजण्यात आलं होतं, मात्र तरीही पंकजा मुंडेंच्या अनेक सर्मथकांनी यावेळी गर्दी केली. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला. त्यानंतर भगवान गडावर पूजा-अर्चना केली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.ऑनलाईन दसरा मेळावा घेतल्याने पंकजा मुंडेंसह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये रासप नेते महादेव जानकर, रमेश कराड यांचाही समावेश आहे. अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments