जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा कोरोनावरील लस चाचणीला ब्रेक

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा कोरोनावरील लस चाचणीला ब्रेक


 


जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा कोरोनावरील लस चाचणीला ब्रेक नवी दिल्ली : कोरोना विषाणूने जगभर हाहाकार माजवला असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या विषाणूवर अद्याप लस आलेली नाही. मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यापासून जगभरात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीचे संशोधन सुरू आहे. अनेक औषध कंपन्या आणि संशोधक संस्था कोरोनावरील लस शोधून काढण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहेत. अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सननेही कोरोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लसीच्या चाचण्या अचानक काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. दरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने शोधलेल्या कोरोना लसीची चाचणी सुरू होती. यासाठी काही स्वयंसेवकांवर लसीचे प्रयोग करण्यात आले होते. मात्र, चाचणीमध्ये सहभागी झालेल्या काही स्वयंसेवकांची प्रकृती अचानक बिघडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत, अशी माहिती जॉन्सन अँड जॉन्सनन कंपनीने दिली आहे. अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अँड जॉन्सनने कोरोनावर लस शोधून काढली आहे. या लसीच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. प्रायोगिक लसीचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली. जॉन्सन अँड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही स्वयंसेवकांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसले नव्हते. त्यामुळे ही लस कोरोनावर अत्यंत प्रभावी समजली जात आहे. मात्र, चाचणीमध्ये सहभागी झालेल्या काही स्वयंसेवकांची प्रकृती अचानक बिघडल्याचे समोर आले. त्यामुळे चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments