बुध्देहाळ येथे 'या' युवा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त देवा (भाऊ) लवटे मित्र परीवाराकडून वृक्षारोपण 


 


बुध्देहाळ येथे 'या' युवा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त देवा (भाऊ) लवटे मित्र परीवाराकडून वृक्षारोपण 
माणदेश एक्सप्रेस टीमकोळा/विशाल मोरे : सांगोला तालुक्याचे माजी आमदार डॉ. गणपतरावजी देशमुख यांचे नातु डॉ.अनिकेत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बुध्देहाळ ता. सांगोला येथील देवा (भाऊ) लवटे मित्र परीवाराच्या वतीने ‘आपले गांव हरीत गांव’ या संकल्पनेतुन महानंदाचे संचालक चंद्रकांत (दादा) देशमुख व सांगोला पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. श्रुतिका लवटे-पाटील व बुध्देहाळ गावचे जेष्ठ नेते अशोक (आण्णा) लवटे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुध्देहाळ गावामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मधील आरोग्य सेविका रुपनर, आरोग्य सेवक गोडसे, आशा वर्कर अर्चना होवाळ, सविता करांडे, ग्रामपंचायत कर्मचारी गजानन जावीर, तात्यासो जावीर, विज वितरण कर्मचारी साहेबराव मिसाळ या सर्वांचा कोव्हीड योध्दा म्हणुन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी देवा लवटे, हरीबा जावीर, दत्ता लवटे, ज्ञानु कोळेकर, बाळु काळे, बिरु लवटे, नवनाथ गवंड, भगवान कोळेकर, समाधान होवाळ, सतिश लवटे, सुब्राव लवटे, दामु कोळेकर, विठ्ठल लवटे , भागवत लवटे यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured