“आता यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील असं वाटत आहे,” : नितेश राणे

“आता यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील असं वाटत आहे,” : नितेश राणे


 


“आता यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील असं वाटत आहे,” : नितेश राणेमुंबई : उद्धव ठाकरे आणि नितेश राणे यांच्या एकमेकांवरती जोरदार टीका चालू आहेत. अशातच आता नितेश राणे यांनी ट्वीटवरून ठाकरे आणि कंगना वादावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यामधील वादामुळे मुंबई महापालिकेला ८२ लाख ५० हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना कराच्या रूपात मुंबई महापालिकेच्या तिजोरीत जमा केलेली ही रक्कम कंगना राणावतविरोधात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईसाठी खर्च झाले आहेत. माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती समोर आली आहे. यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.


 


“पेंग्विन आणि कंगनाच्या खटल्यासाठी मुंबईकर कर भरतात. आता काय शिल्लक आहे. आता यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील असं वाटत आहे,” असं म्हणत नितेश राणे यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या प्रकरणावर भाष्य करत टीका केली.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments