रेस्टारेंट, बारच्या वेळेत वाढ : राज्य सरकारची नवीन नियमावली 

रेस्टारेंट, बारच्या वेळेत वाढ : राज्य सरकारची नवीन नियमावली 


 


रेस्टारेंट, बारच्या वेळेत वाढ : राज्य सरकारची नवीन नियमावली मुंबई - राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्यातील रेस्टारेंट आणि बार सुरू करण्याचा निर्णय घेतला मात्र, रेस्टारेंट बारच्या वेळेसंदर्भात रेस्टारेंट आणि बार मालकांमध्ये संभ्रम होता. मात्र, बुधवार पर्यटन विभागाने काढलेल्या सुधारित नवीन आदेशावरून रेस्टारेंट, बार मालकांना वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे बार मालकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र रेस्टारेंट,बार चालकांनी ही वेळ पुरेसी नसल्याचे सांगून, पुढच्या आठवड्यात पालिका आयुक्तांना भेटून वेळ अधिक वाढवून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगीतले.नवीन आदेशानुसार आता रेस्टारेंट आणि बार सकाळी 8 वाजता सुरू होऊन रात्री 10 वाजता बंद करता येणार आहे. राज्य सरकारने यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी मिशन 50 टक्के क्षमतेने रेस्टारेंट, बार सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी कोविड नियमावलीही जारी करण्यात आली होती. मात्र वेळेचे बंधन घातल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय रेस्टारेंट बार किती वाजेपर्यंत सुरू ठेवावे यासंदर्भात संभ्रम असल्याने अनेक मद्य विक्रेत्यांनी आपले बार उघडलेच नव्हते.
रेस्टोरंट आणि  बार रात्री 10 वाजता बंद करण्याचा वेळ पाळणे बंधनकार असणार आहे. त्या व्यतिरीक्त पालिकेने ठरवून दिलेल्या वेळा संबधीत भागातील हॉटेल, रेस्टारेंट,बारला चालकांना बंधनकारक आहेत.ही नियमावली रेस्टारेंट, रिसॉर्ट, डायनिंग हॉल, क्लब, कॅफे सर्वांवर लागू असणार आहे.राज्य सरकारने 5 ऑक्टोबर रोजीच रेस्टोरेट बार सुरू करण्याचे आदेश दिले मात्र, वेळेबद्दल संभ्रम होता. त्यामुळे बार सुरू केले नव्हते मात्र, नव्याने काढलेल्या आदेशानंतर हा संभ्रम दूर झाला, मात्र मद्य विक्री खऱ्या अर्थाने रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत होत असते. मात्र, नवीन आदेशानुसार 10 पर्यंतची वेळ दिल्याने समाधान आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments