मुंबईतील सिटी सेंटर मॉलमध्ये आग : दोन जखमी, 700 लोकांना बाहेर काढण्यात यश

मुंबईतील सिटी सेंटर मॉलमध्ये आग : दोन जखमी, 700 लोकांना बाहेर काढण्यात यश


 


मुंबईतील सिटी सेंटर मॉलमध्ये आग : दोन जखमी, 700 लोकांना बाहेर काढण्यात यशमुंबई : मुंबईतील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलमध्ये ही आग लागली. रात्री एका मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकली आणि ती मॉलमध्ये पसरल्याची माहिती मिळाली आहे . या आगीमुळे कोटींचं नुकसान झालं आहे. संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल आला असून गेल्या 11 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.ही आग विझवण्यात अग्निशमन दलातील दोन जवान देखील जखमी झाली असून 700 लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.


 


या  आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. तसेच आगीमध्ये कोणालाही इजा किंवा जीवतहानी झालेले नाही. मुंबई सेंट्रल येथील क्लासिक रोडवर हा मॉल आहे. अग्निशमन दलाने या आगीला लेव्हल 3 ची आग म्हणून घोषित केले आहे. 11 तास उलटूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळू शकलं नाही.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments