सुशांतसिंग प्रकरणी राज्याला बदनाम करण्यासाठी ८० हजार फेक अकाउंट्स ; या काँग्रेसच्या आमदाराचा आरोप 


 


सुशांतसिंग प्रकरणी राज्याला बदनाम करण्यासाठी ८० हजार फेक अकाउंट्स ; या काँग्रेसच्या आमदाराचा आरोप 
माणदेश एक्सप्रेस टीम 



आटपाडी : सुशांतसिंग प्रकरणावरून महाराष्ट्र राज्याला बदनाम करण्यासाठी तब्बल ८० हजार फेक अकाउंट्स बनविण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केला असून याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.



हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने दिनांक  १४ जून रोजी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या आत्महत्येवरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपने राज्यातील सरकारच्या विरोधात जोरदार आवाज उठवित आरोप-प्रत्यारोप केले. माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार नारायण राणे व त्यांच्या पुत्रांनी शिवसेनेच्या विरोधात जोरदार आरोप केले. शिवसेनेच्या एका युवा नेत्यावर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले. 



एम्सच्या डॉक्टरांच्या अहवालानुसार अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यातून काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे भाजप व भाजपचा आयटीसेल तोंडघशी पडले. याबाबत आमदार भाई जगताप यांनी निशाना साधला असून राज्याला बदनाम करण्यासाठी तब्बल ८० हजार फेक अकाउंट्स बनविली असल्याचा आरोप केला असून याबाबत त्यांचा रोख भाजपकडे आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured