एकनाथ खडसेंची भाजपाला सोडचिठ्ठी शुक्रवारी राष्ट्रवादीचं 'घड्याळ' बांधणार!

एकनाथ खडसेंची भाजपाला सोडचिठ्ठी शुक्रवारी राष्ट्रवादीचं 'घड्याळ' बांधणार!


 


एकनाथ खडसेंची  भाजपाला सोडचिठ्ठी शुक्रवारी राष्ट्रवादीचं 'घड्याळ' बांधणार!मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, खडसे हे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.


 


एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलण्यात आलं होतं. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments