ऐतवडे खुर्द येथे पाच वर्षीय जुळ्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू : शेवटीही दोघींची एकमेकिना घट्ट मिठी

ऐतवडे खुर्द येथे पाच वर्षीय जुळ्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू : शेवटीही दोघींची एकमेकिना घट्ट मिठी


ऐतवडे खुर्द येथे पाच वर्षीय जुळ्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू : शेवटीही दोघींची एकमेकिना घट्ट मिठीसांगली : वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथे पाच वर्षीय जुळ्या बहिणींचा गुरुवारी तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे. वेदिका आणि विद्या विजय बर्गे (वय 5) अशी या मृत बहिणींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, भैरवनाथ मंदिराच्या परिसरात वडील विजय बर्गे यांनी भुईमुगाच्या शेंगा उन्हात घातल्या होत्या. शेंगा राखण करण्यासाठी विद्या व वेदिका वडिलांसमवेत गेल्या होत्या. या मुलींना वडिलांनी त्यांना घरी आणले होते. दुपारी दोघी बहिणी घरात कोणालाही न सांगताच तलावाशेजारी खेळण्यासाठी गेल्या होत्या. वडिलांनी दोघींचा शोध घेतला. परंतु, त्या कुठेही दिसून आल्या नाहीत. या दोघी सापडत नसल्याची माहिती गावात पसरली. गावातील युवक एकत्र गोळा झाले. सर्व गावात शोधमोहीम राबवली. तरीही त्या मिळून आल्या नाहीत. गावातील लोकांना तसेच युवकांना तलावामध्ये खेळता-खेळता तलावामध्ये पडल्या असल्याची शंका आली. तलावाशेजारीच त्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. तलावात शोध सुरू केला. तलावात दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. कुरळप पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अरविंद काटे यांनी घटनास्थळी भेट दिली. युवकांनी या जुळ्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले, तेव्हा या दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली होती. आई-वडिलांनी मुलींना पाहताच हंबरडा फोडला. दुपारपर्यंत वडिलांसोबत असणार्या  मुली खेळता-खेळता तलावात पडून मृत पावल्याने उपस्थितांनाही हुंदका आवरला नाही. बर्गे यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे. बर्गे यांना आणखी एक लहान मुलगी आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments