लहान मुले दिसताच आमदार पडळकरांनी सोशल मिडियावर शेअर केल्या बालपणीच्या आठवणी

लहान मुले दिसताच आमदार पडळकरांनी सोशल मिडियावर शेअर केल्या बालपणीच्या आठवणी


 


लहान मुले दिसताच आमदार पडळकरांनी सोशल मिडियावर शेअर केल्या बालपणीच्या आठवणी
माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/धिरज प्रक्षाळे : भारतीय संस्कृतीमध्ये वर्षातील येणारे सर्व सणांचे मोठे महत्त्व आहे. हे सर्व सण भारतीय लोक आप-आपल्या रूढी व चालीरीती प्रमाणे साजरे करतात. यामुळे घरातील वातावरण आनंदी-आनंद असते. परंतु कोरोनामुळे हे पारंपारिक सण यावर्षी मोठ्या प्रमाणात साजरे करता आले नसले तरी घरगुती पद्धतीने साजरे करण्यात आले. सध्या नवरात्र सण सुरु आहे. यावेळी घटस्थापना करून देवीचे नऊ दिवस उपवास केले जातात. यावेळी जो घट बसविले असतो त्या घटाला दररोज एक फुलाची माळ घालण्याची परंपरा आहे. परंतु फुलाची माळेसाठी प्रामुख्याने  माळरानावर उगविणाऱ्या “तरवाड” या झाडाच्या फुलाला महत्त्व आहे. त्यामुळे लहानपणी मित्र-मंडळी सोबत ओढ्या, नदी कडेला गेले की या झाडाची फुले आणायची व येताना ओढ्याला, नदीला स्नान करून यायचे असा क्रम असायचा. ह्याच बालपणीच्या आठवणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेअर केल्या आहेत.
बारामतीला येथे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला विरळी घाटातून जात असताना घाटामध्ये लहान-लहान मुले तरवाडाची फुले नेण्यासाठी आली होती. यावेळी मुलांनी मोठ्या प्रमाणात फुले गोळा केली होती. मुलांना पाहताच आमदार पडळकरांची गाडी त्या ठिकाणी थांबली व त्यांना आपले बालपण आठवले. त्यांनी यावेळी लहान मुलासोबत फोटो काढून आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.  


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज 


Post a Comment

0 Comments