Type Here to Get Search Results !

म्हसवडमध्ये शेळ्या-मेंढ्या आठवडी बाजार सुरु ; शेतकऱ्यांसह खरेदीदारांची मोठी गर्दी 


 


म्हसवडमध्ये शेळ्या-मेंढ्या आठवडी बाजार सुरु ; शेतकऱ्यांसह खरेदीदारांची मोठी गर्दी 
माणदेश एक्सप्रेस टीम 



म्हसवड/अहमद मुल्ला : गेल्या मार्च महिन्यात कोराना साथीच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहिर केल्यानतर तब्बल सात महिन्यानंतर आज येथील शेळ्यामेंढ्यांचा आठवडी बाजार सुरु झाल्यामुळे  शेतकरी व खरेदीदारांची मोठी गर्दी झाली. माण तालुक्यामधील म्हसवड येथे शेळ्या मेढ्यां विक्रीचा पहिला लॉकडाऊनच्या कालावधीतील पहिलाच आठवडी बाजार भरला.


 


 



आज सकाळ पासुन या बाजारात गावेगावचे शेतकरी व मेढपाळ शेळ्या-मेढ्या विक्रीसाठी घेऊन आल्यामुळे बाजारात जनावरांची आवक मोठ्या संख्येने झाली. शेळ्या, मेढ्या, बोकड खरेदीसाठीही कोकणपट्टीसह कोल्हापूर,सांगली,सातारा व सोलापूर जिल्ह्यामधील खरेदीदारांची उपस्थिती मोठी होती.


 


 




विशेषत: माण तालुक्यामधील शेळ्या, बोकड, मेंढ्या व बकऱ्याच्या मटणास चवच वेगळी असते त्यामुळे या भागातील या जनावरांच्या मटणास गावोगावच्या व विशेषत:शहरी भागातील ग्राहंकांची मोठी मागणी व पसंतीही असल्यामुळे आजच्या या पहिल्या बाजारात कोकण, कोल्हापूर,सातारा,सांगली, सोलापूर इत्यादी जिल्ह्यामधील मटण विक्रेते आज बोकड शेळ्या खरेदीसाठी छोटी मोठी सोबत वहाने घेऊन आज खरेदीसाठी बाजारात आले होते.


 


 



कोरोनाच्या साथीमधील लॉकडाऊनमुळे येथील जनावरांचा आठवडी बाजारच बंद राहिल्यामुळे मेष व शेळी पालन व्यवसाईतील शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील आर्थिक नाडीच बंद पडली होती.विजया दशमी व दीपावली सणापुर्वी जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणून शेळ्या मेंढ्यासह मोठ्या जनावरांचा बाजार सुरु करण्यास  परवानगी दिल्यामुळे शेतकरी बांधवास दिलासा मिळाला आहे.


 


 



जनावरांचा आठवडी बाजार सुरु झाल्यामुळे स्थानिक पातळीवर बाजारातच बोकडांची खरेदी करणे सोयीचे झाले. लॉकडाऊनमुळे सुमारे ३६ आठवडी बाजार भरलेच नाहीत, परिणामी मटण विक्रीसाठी आवश्यक असलेली बोकड, बकरे रोज खेड्यापाड्यातून शोधून आणावे लागत होते व यातच वेळ खर्ची पडत होत असे.
नूरमहंमद मुजावर
मटण विक्रेते, म्हसवड


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies