दिघंचीतील ७ जणांनी एकास मारहाण करून रोख २४ हजारासह पावणे दोन तोळे सोन्याची चैन केली लंपास 

दिघंचीतील ७ जणांनी एकास मारहाण करून रोख २४ हजारासह पावणे दोन तोळे सोन्याची चैन केली लंपास 


 


दिघंचीतील ७ जणांनी एकास मारहाण करून रोख २४ हजारासह पावणे दोन तोळे सोन्याची चैन केली लंपास 
माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : दिघंची येथील ७ जणांनी पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथील एकाला दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली येथे एका बंद खोलीत नेवून मारहाण करून त्याच्याकडील रोख २४ हजार रुपये व गळ्यातील पावणे दोन  तोळ्याची चैन लंपास केल्याची घटना दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी २.३० च्या दरम्यान घडली असून याबाबत आटपाडी पोलीस ठाणेस गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी किरण धर्मराज चंदनशिवे (व.व. २८) हे पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथील रहिवाशी असून ते शेती व मजुरी काम करतात. ते पत्नी रुपाली व मुलगा शौर्य यांना भेटण्यासाठी दिघंची येथे चालले असता आरोपी सुरज रणदिवे व नितीन रणदिवे यांनी संगनमत करून फिर्यादी यांची मोटारसायकल घेवून जावून दिघंची गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ घेवून जावून यातील आरोपी क्र. १ सुरज रणदिवे याने त्यांचे हातातील लोखंडी रॉड ने व आरोपी क्र. २ नितीन रणदिवे याने लाकडी स्टंप ने फिर्यादीच्या हातावर व मनगटावर मारहाण केली. तसेच तेथून पुढे ३ किमी अंतरावर असणाऱ्या एका बंद खोलीत घेवून जावून ७ अनोळखी आरोपींनी फिर्यादीचे हातपाय बांधून त्यास मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या खिशातील रोख रुक्क्म २४ हजार रुपये व गळ्यात असणारी पावणे दोन तोळ्याची सोन्याची चैन काढून नेली व जीवे मारण्याची धमकी दिली. 
याबाबत फिर्यादी किरण धर्मराज चंदनशिवे यांनी आटपाडी पोलीस ठाणेस फिर्याद दिली असून अधिक तपास पोउनि पाटील हे अधिक तपास करीत आहेत.   


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments