जेईई मुख्य परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये : केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल

जेईई मुख्य परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये : केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल


 


जेईई मुख्य परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये : केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल


 नवी दिल्ली : देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतून शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. जेईई मुख्य परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये देखील घेण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटद्वारे माहिती दिली.


 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण- 2020 मध्ये मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसारच हा निर्णय असल्याचे पोखरियाल यांनी जाहीर केले. देशातल्या २२ प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यायचे आमचे धोरण आहे. कुठलीही एक भाषा लादायचा यामागे उद्देश नाही. इंग्रजी नको असा आग्रह नाही. परंतू, भाषा निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना हवे. भाषा ज्ञानसंपादनात अथवा शिक्षणात अडथळा ठरता कामा नये, असा या धोरणामागचा उद्देश असल्याचे पोखरियाल यांनी स्पष्ट केले.आयआयटी जेईई या परीक्षेसाठी  विद्यार्थी दहावीच्या आधीपासूनच तयारी करत असतात. परंतू, मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेतून उत्तरे लिहिणे अधिक सोयीस्कर असते. राज्य पातळीवरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश हवा असेल तर विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेतून उत्तरे लिहण्याची मुभा असावी, असे  पोखरियाल यांनी स्पष्ट केले.            


         


संयुक्त प्रवेश मंडळाकडून आयआयटी तसेच इतर मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर जेईई परीक्षा आयोजित केली जाते. जेएबीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा असल्याचा दावा यानिमित्ताने सरकारकडून केला जात आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


Post a comment

0 Comments