Type Here to Get Search Results !

बेटी बचाओ, बेटी पढावो, या मोहिमेच्या उलट कारभार : हाथरसच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगी सरकारला टोला 


 


बेटी बचाओ, बेटी पढावो, या मोहिमेच्या उलट कारभार : हाथरसच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगी सरकारला टोला 


 


मुंबई - उत्तर प्रदेशमधील  हाथरस येथे एका तरुणीवर बलात्कार करून करण्यात आलेल्या तिच्या हत्येवरून संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस आणि प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे  उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे  यांनीही या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढावो अभियानाच्या अगदी विरोधात कारभार सुरू आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.


 


सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, बेटी बचाओ, बेटी पढावो, या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या अगदी उलट कारभार उत्तर प्रदेशात सुरु आहे. हाथरस येथील घटनेनंतर बलरामपूर येथे सामूहिक बलात्कार व हत्येची आणखी एक घटना उजेडात आली. हे कधी थांबणार आहे? असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. तसेच या अमानुष घटना थांबविण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कठोर कायदे करण्याची व ते राबविण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी मांडले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies