ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांशी वाद झालेल्या डीवायएसपीला कराडहून थेट नागपुरात पदोन्नती

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांशी वाद झालेल्या डीवायएसपीला कराडहून थेट नागपुरात पदोन्नती


 


ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांशी वाद झालेल्या डीवायएसपीला कराडहून थेट नागपुरात पदोन्नती  सातारा : कराडचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांची सहायक पोलीस आयुक्त म्हणून नागपूरला पदोन्नतीवर बदली झाली आहे. दोन वर्षापूर्वी कोल्हापूर महापौर निवडीवेळी विद्यमान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेत्यांशी त्यांचा झालेला वाद चांगलाच गाजला होता. हसन मुश्रीफ आता सत्तेत असताना गुरव यांना पदोन्नती मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पोलीस उपअधीक्षक गुरव यांची चिपळूणहून कराडला एक वर्षापूर्वी 22 सप्टेंबर 2019रोजी बदली झाली होती. गुरव यांनी पदभार स्वीकारताच गुंड टोळ्यांना हिसका दाखवायला सुरूवात केली. रस्त्यावर वाढदिवस साजरा करत तलावरीने केक कापणाऱ्यांना , फटक्यांची आतषबाजी करून शांततेचा भंग कापणाऱ्यांना पोलिसी हिसका दाखवून गुरव यांनी वेगळी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर गुंडगिरीची स्टेटस् ठेवणाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्यादेखील दाखविला. गुरव यांनी दोन मोक्काच्या आणि एक स्थानबद्धतेची कारवाई केली. कोरोनाकाळात ’कराडची माणुसकी’ नावाचा ग्रुप तयार करून अन्नधान्याची कीट गरजूंपर्यंत पोहोचवून कोविड योद्ध्याची भूमिका त्यांनी पार पाडली. परंतु आता सूरज गुरव यांची सहायक पोलीस आयुक्त म्हणून नागपूरला बदली झाली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments