आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०८ रोजी कोरोनाचे १० नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण, वाचा बातमी सविस्तर
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात गेल्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे तालुक्यातील असणाऱ्या कोविड सेंटर वरचा ताण काही प्रमाणात कमी झाला होता. रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने प्रशासन ही थोडे निवांत झाले होते. परंतु काल पुन्हा एकदा या संसर्गजन्य विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण वाढले होते. परंतु आज दिनांक ०८ रोजी हे प्रमाण कमी झाले असून आज फक्त १० नवे रुग्ण आढळून आले आहेत.
गावनिहाय रुग्णसंख्या
आटपाडी = ०३
काळेवाडी (करगणी) = ०१
नेलकरंजी (आटपाडी) = ०१
दिघंची = ०४
लिंगीवरे = ०१
आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण ०९ असून स्त्री रुग्ण ०१ असे एकूण १० नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज