गायक कुमार सानू यांनी मागितली माफी 

गायक कुमार सानू यांनी मागितली माफी 


 


गायक कुमार सानू यांनी मागितली माफी मुंबई : जान कुमार सानूच्या नुकत्याच झालेल्या वादावर कुमार सानू म्हणाले की, 'जानने नकळत मराठी भाषेबाबत जे बोलले ते पूर्णपणे चुकीचं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, बंगाली जर माझी देवकी आई आहे जिने मला जन्म दिला तर मुंबई माझी यशोदा आई आहे. जिने मला काम दिलं, अन्न दिल आणि मान-सन्मान दिला. माझी आई मुंबा देवीवर श्रद्धा आहे. कोणत्याही कलाकाराने मुंबईबाबत वाईट बोलू नये. मुंबईने अनेकांना जीवन दिलं आहे'


 


ते म्हणाले की, 'मी ऐकलं की, माझ्या मुलाने शोमध्ये फार चुकीचं विधान केलं. मी कधीही ४० वर्षात असा विचार केला नाही. महाराष्ट्राबाबत असा विचार करण्याचा मी विचारही करू शकत नाही. मी सर्वच भाषांचा आदर करतो आणि प्रत्येक भाषेत गाणी गायली आहेत. मी माझ्या मुलापासून गेल्या २७ वर्षांपासून वेगळा आहे. मला नाही माहीत त्याच्या आईने त्याला काय शिकवलं. एक पिता या नात्याने मी केवळ माझ्या मुलासाठी तुम्हा सर्वांची माफी मागू शकतो'.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments