राष्ट्रवादीमध्ये न जाता आरपीआयमध्ये यायला हवे होते : रामदास आठवले

राष्ट्रवादीमध्ये न जाता आरपीआयमध्ये यायला हवे होते : रामदास आठवले


 


राष्ट्रवादीमध्ये न जाता आरपीआयमध्ये यायला हवे होते : रामदास आठवलेबारामती : केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज गावामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. 


 आठवले म्हणाले, एकनाथ खडसे यांच्याकडे सध्या आमदारकी नसल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत. तेथे त्यांना आमदारकीसह मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये न जाता आरपीआयमध्ये यावे अशी अपेक्षा होती. मात्र,ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. तसेच खडसे यांच्याबरोबर भाजपचे १५,१६ आमदार जातील असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments