‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत पुणे महापालिकेकडून पहिल्या फेरीत २ ऑक्टोबरपर्यंत २० लाख १५ हजार १९५ नागरिकांची तपासणी'

पुणे : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत पुणे महापालिकेकडून पहिल्या फेरीत २ ऑक्टोबरपर्यंत २० लाख १५ हजार १९५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे़ या तपासणीतून ९१२ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आहे.      पुणे महापालिकेडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम पहिल्या टप्प्यात १० ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येत असून, याकरिता १ हजार २६ पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात १ आरोग्य कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधींकडील स्वयंसेवक कार्यरत आहेत. प्रत्येक पथकाकडून दररोज ५० घरांना भेटी देऊन, यात घरातील सदस्यांना ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन पातळी तपासणे, कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना जवळच्या महापालिकेच्या दवाखान्यात पाठविणे़ तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोबाईल अ‍ॅपमध्ये सर्व माहिती भरण्याचे काम या पथकांकडून करण्यात येत आहे.     २ ऑक्टोबरपर्यंत शहरातील ६ लाख ३८ हजार ३५६ घरांना मोहिमेतील पथकांनी भेटी दिल्या आहेत. यात १ लाख २० हजार ७९२ व्यक्तींना विविध आजार असल्याचे आढळून आले असून, यापैकी ७ हजार ६०२ व्यक्तींना पुणे महापालिकेच्या दवाखान्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले.यात आत्तापर्यंत ९१२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ क़ुणाल खेमनार यांनी दिली.  

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments