रोहित दादा  जरा पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा,  म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल : गोपीचंद पडळकर


 


रोहित दादा  जरा पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा,  म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल : गोपीचंद पडळकरमुंबई - रोहित पवार हे नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि न्यूज चॅनेल्सवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. नेहमीच या बड्या नेत्यांना सल्ले देत असतात. आपण खूप मोठे नेते झालो आहोत, या अविर्भावात ते असतात. मात्र, शरद पवार यांच्या खांद्यावरुन तुम्ही तुमची उंची मोजू नका. रोहित दादा  जरा पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल, अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर थेट कर्जत-जामखेड मतदारसंघातून टीका केली.पडळकर यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगावातील रस्त्यावर उतरुन पडळकर यांनी तेथील रस्त्याची दूरवस्था व्हिडिओच्या माध्यमातून मांडली. तुम्हाला साधा गावातला रस्ता करता येत नसेल आणि तुम्ही देशाच्या नेतृत्वाला सल्ले देता. हे सल्ले देण्यापेक्षा कर्जत-जामखेड मतदारसंघातील लोकांचे प्रश्न जाणून घ्या. राज्यात तुमचे सरकार आहे, येणाऱ्या काही दिवसांत तुम्ही मतदारसंघातील रस्ते चांगले करावेत, मग इतरांना सल्ले द्यावेत ही विनंती, अशी टीका पडळकर यांनी केली आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured