चलनातील नोटा या बॅक्टेरीया आणि वायरसच्या वाहक आहेत का : रिझर्व बॅंक ऑफ इंडीया


 


चलनातील नोटा या बॅक्टेरीया आणि वायरसच्या वाहक आहेत का : रिझर्व बॅंक ऑफ इंडीयानवी दिल्ली : नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का ? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. आता रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. कोरोना संक्रमण नोटांनी देखील होऊ शकते. नोटांचा व्यवहार केल्याने कोरोना संक्रमण तुमच्या शरीरापर्यंत पोहोचू शकते असे इंडस्ट्री बॉडी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स (CAIT) ने म्हटलंय. नोटांमुळे कोरोना पसरण्याच्या वृत्ताला आरबीआयने याला दुजोरा दिलाय. चलनातील नोटा या बॅक्टेरीया आणि वायरसच्या वाहक आहेत का ? असा प्रश्न CAIT ने ९ मार्चला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांना केला होता. सरकारकडून आरबीआयला यासंदर्भातील एक पत्र गेलंय. आणि ३ ऑक्टोबरला यासंदर्भात उत्तर देण्यात आलंय. ईमेलच्या माध्यमातून दिलेल्या या उत्तरात नोटा या बॅक्टेरीया आणि वायरसच्या वाहक असू शकतात असं म्हटलं गेलंय. यातून वाचण्यासाठी डिजीटल पेमेंट हा पर्याय असल्याचे आरबीआयने सुचवले आहे. मोबाईल आणि इंटरनेट बॅंकीग, क्रेडीट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेट करावे. यामुळे रोख रक्कमेशी प्रत्यक्षात संपर्क कमी येईल. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो असे देखील आरबीआयने म्हटलंय. डिजीटल पेमेंट करणाऱ्यांना सवलत देण्याच्या योजनाही आरबीआयने म्हटलंय. डिजीटल व्यवहार करणाऱ्या बॅंकाना सबसिडी द्यायला हवी. ही सबसिडीचा आरबीआयवर आर्थिक बोजा नसेल. नोटांवर होणारा खर्च कमी होईल असे CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटलंय. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured