डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा शरीर आणि मनावर दीर्घकाल परिणाम

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा शरीर आणि मनावर दीर्घकाल परिणाम


 


डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा शरीर आणि मनावर दीर्घकाल परिणाम 


 


मुंबई : राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 86.48 टक्के इतकं झालं आहे. असं असताना आता रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांबाबत चिंता संपली अशी नाही. तर या रुग्णांवरही कित्येक महिने कोरोनाचा प्रभाव कायम राहत आहे.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं 2 ते 3 महिने कायम राहत असल्याचं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात दिसून आलं आहे.


  


यूकेतील 58 कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर श्वास घ्यायला त्रास, थकवा जाणवत होता. त्यांच्यामध्ये एन्झायटी, डिप्रेशन होतं.दोन ते तीन महिने 64% रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता, 55% रुग्णांना थकवा जाणवत होता.काही रुग्णांच्या अनेक अवयवांना हानी पोहोचल्याचं दिसून आलं. अनेक महिने त्यांच्या अवयवांवर सूज कायम राहिली.


  


या रुग्णांची तपासणी केली असता, 60% रुग्णांच्या फुफ्फुसांना, 29% रुग्णांच्या किडनीला, 26% रुग्णांच्या हृदयाला, 10% रुग्णांच्या लिव्हरला हानी पोहोचली होती.संशोधनाचे अभ्यासक बेट्टी रेमन म्हणाले, कोव्हिड 19 संबंधित शारीरिक प्रक्रिया या अभ्यासातून अधोरेखित होते. कोरोना रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याच्या क्लिनिक केअरसाठी एक मॉडेल तयार करण्याची गरज आहे, हे यातून समजतं.


 


ब्रिटनमधील नॅशनल इन्स्टिट्युट फॉर हेल्थ रिसर्चने देखील (Britain’s National Institute for Health Research - NIHR) गेल्या आठवड्यात बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांबाबत असाच अहवाल जारी केला होता. ज्यामध्ये कोरोना शरीर आणि मनावर दीर्घकालीन परिणाम करत असल्याचं दिसून आल्याचं सांगण्यात आलं.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments