IPL 2020 : CSK vs KXIP ; चेन्नईने केला किंग्स इलेव्हन पंजाबचा १० गड्यांनी पराभव  


 


IPL 2020 : CSK vs KXIP ; चेन्नईने केला किंग्स इलेव्हन पंजाबचा १० गड्यांनी पराभव  दुबई : किंग्स इलेव्हन पंजाबचा चेन्नई सुपर किंग्सने १० गड्यांनी पराभव करीत विजय मिळवला व आपली पराभवाची गाडी रुळावर आणली. प्रथम फलंदाजी करीत किंग्स इलेव्हन पंजाबच्या लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी सुरुवातही तशीच करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. पीयूष चावलानं ही भागीदारी तोडली. त्याने मयांकला २६ धावांवर माघारी पाठवले. करुण नायरच्या जागी संघात मनदीप सिंगला स्थान देण्यात आले होते आणि त्यानं दोन खणखणीत षटकार मारून सुरुवात केली मात्र, त्याला रवींद्र जडेजाच्या फिरकीचा अंदाज ण आल्याने अंबाती रायुडूच्या हाती झेल देत २७ धावांवर माघारी बाद झाला. निकोलस पूरन आणि लोकेश यांनी दमदार फटकेबाजी करून KXIPचा डाव रुळावर आणला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. शार्दुल ठाकूरने एकाच षटकात दोघांनाही माघारी पाठवले. पूरनने १७ चेंडूंत ३ षटकारांसह ३३ धावा, तर लोकेशनं ५२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ६३ धावा केल्या. किंग्स इलेव्हन पंजाबला ४ बाद १७८ धावांपर्यंत मजल मारता आली. CSK कडून शेन वॉटसनने व फॅफ ड्यू प्लेसिस  KXIP च्या गोलंदाजांवर प्रहार केला. गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना दमदार भागीदारी केली. 162 वी धाव घेताच या दोघांनी CSK कडून सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विक्रम नावावर केला. व १० गड्यांनी KXIP चा पराभव केला.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured