IPL 2020 :  DD Vs RCB : दिल्ली कॅपिटल्स चा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वर शानदार विजय  ; गुणतलिकेत अव्वल स्थानी झेप


 IPL 2020 :  DD Vs RCB : दिल्ली कॅपिटल्स चा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वर शानदार विजय  ; गुणतलिकेत अव्वल स्थानी झेप


 


दुबई : मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी RCB च्या स्वप्नांची राखरांगोळी करत फटकेबाजी केल्याने १९७ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजी रबाडाच्या गोलंदाजी समोर ढेपाळली आणि दिल्ली कॅपिटल्स ने शानदार विजयाची नोंद करत गुणतलिकेत अव्वल स्थानावर पुन्हा झेप घेतली.


 


पृथ्वी शॉ आणि शिखर धवन  यांनी दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पाच षटकात 50 धावा फलकावर चढवल्या. पृथ्वी शॉला ( 42 धावा) आणि शिखर धवन ( 32) बाद झाले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरला बाद करण्यात RCB ला यश मिळाले. मार्कस स्टॉयनिस आणि रिषभ पंत  यांनी 89 धावांची भागीदारी करून RCB च्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रिषभ पंत 37 धावांवर (3 चौकार व 2 षटकार) माघारी परतला. स्टॉयनिस 53 धावांवर नाबाद राहिला. (6चौकार व 2 षटकार) दिल्लीनं 4 बाद 196 धावा केल्या.


 


प्रत्युत्तरात RCB ची सुरुवात ही खराब झाली. आरोन फिंचलाही कागिसो रबाडानं जीवदान दिले. पण, त्याला मोठी खेळी करता आली नाही. RCB चा इनफॉर्म फलंदाज देवदत्त पडीक्कलही आज स्वस्तात माघारी परतला. RCB चे दोन्ही सलामीवीर 27 धावांवर माघारी परतले. विराट आणि मोइन अली सामना DC च्या हातून काढतील असेच वाटत होते. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील अपयश अलीचा IPL मध्येही पाठलाग सोडत नसल्याचे दिसले. तो 11 धावांवर बाद झाला. विराट कोहली धावा कुटत होत्या आणि त्याला रोखण्यासाठी कागिसो रबाडाला पाचारण करण्यात आले. DC चा हा डाव यशस्वी ठरला. 43 धावांवर विराटही बाद झाला.


 


कागिसो रबाडानं  24 धावांत 4 विकेट्स घेतल्या. नॉर्ट्जे व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 196 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या RCB ला 9 बाद 137 धावा करता आल्या. दिल्ली कॅपिटल्सनं हा सामना 59 धावांनी जिंकला.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured