Type Here to Get Search Results !

IPL 2020 : MI vs RR : मुंबई इंडियन्स ५७ धावांनी विजयी : राजस्थानचे रॉयल्स ला केले पराभूत 


 


IPL 2020 : MI vs RR : मुंबई इंडियन्स ५७ धावांनी विजयी : राजस्थानचे रॉयल्स ला केले पराभूत 



अबु धाबी : IPL 2020 च्या २० व्या सामन्यात  मुंबई इंडियन्स समोर राजस्थानचे ‘रॉयल्स’ ढेपाळळे असून मुंबई इंडियन्सने ५७ धावांनी रॉयल्स विजयी मिळविला.



रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. MI च्या संघात कोणताही बदल करण्यात आला नसला तरी RR ने आज तीन बदल केले आहे. जयदेव उनाडकट, रॉबीन उथप्पा आणि रियान पराग यांना संघाबाहेर केले असून यशस्वी जैस्वाल व अंकित राजपूत यांचे कमबॅक झाले आणि 19 वर्षांखालील वर्ल्ड कप संघातील मॅचविनर गोलंदाज कार्तिक त्यागी पदार्पण केले. रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Quinton de Kock) यांनी स्फोटक सुरुवात केली. अंकित राजपूतला टार्गेट करत दोघांनी धावा कुटल्या. 



गोलंदाज कार्तिक त्यागीने ला रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून त्याचे स्वागत केले. पण, त्याच षटकात कार्तिकनं MI ला धक्का दिला. क्विंटन डी'कॉकला ( 23) अप्रतिम बाऊंसर टाकून त्यानं झेलबाद करून माघारी पाठवले. श्रेयस गोपाळनं एकाच षटकात रोहित शर्मा (35)  व इशान किशन ( 0) यांना सलग चेंडूंवर बाद केले. त्यानंतर हार्दिक पांड्या किंवा किरॉन पोलार्ड येणं अपेक्षित होतं, परंतु कृणाल पांड्याला आघाडीवर पाठवले. पण, कृणाल 12 धावा करून जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मुंबई इंडियन्सच्या 15 षटकांत 4 बाद 124 धावा झाल्या होत्या. सूर्यकुमार यादवनं 34 चेडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केलं. 



हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) आणि यादवनं अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. हार्दिकला 18व्या षटकात कुरनकडून जीवदान मिळालं. 19 व्या षटकात जोफ्रा आर्चरनं 152 kph च्या वेगानं टाकलेल्या बिमरनं हार्दिकचं डोकंच फुटले असते, पण वेळेत तो खाली बसला आणि चेंडू यष्टिरक्षकालाही अडवता न आल्यानं सीमापार गेला. सूर्यकुमार आणि हार्दिकनं अखेरच्या पाच षटकांत 12 च्या सरासरीनं धावा चोपून मुंबई इंडियन्सला मोठा पल्ला गाठून दिला. सूर्यकुमारने 47 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या, हार्दिक 30 धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी 76 धावांची भागीदारी करून संघाला 4 बाद 193 धावांचा पल्ला गाठून दिला. 



प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल ( 0), कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( 6) आणि संजू सॅमसन ( 0) हे 12 धावांत माघारी परतले. ट्रेंट बोल्टने दोन, तर जसप्रीत बुमराहनं 1 विकेट घेतली. जोस बटलर ( Jos Buttler ) आणि महिपाल लोम्रोर ( Mahipal Lomror) यांनी 30 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. राहुल चहरनं राजस्थान रॉयल्सचा मोठा धक्का दिला. चहरच्या गोलंदाजीवर लोम्रोरनं मारलेला फटका उत्तुंग उडाला आणि बदली खेळाडू म्हणून आलेल्या अनुकूल रॉयनं उलट्या दिशेनं धाव घेत हवेत झेपावत IPL 2020 मधील अविश्वसनीय झेल घेतला. 



14व्या षटकात जेम्स पॅटिसन्सने RRच्या उरलेल्या विजयाच्या आशाही मावळून टाकल्या. जोस बटलर 44 चेंडूंत 4 चौकार व 5 षटकारांसह 70 धावा करून माघारी परतला. किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) सीमारेषेवर त्याचा झेल टिपला. पण, हा झेल टिपताना पोलार्डची चांगलीच कसरत झाली. पुढील 38 धावांत RRचे उर्वरित फलंदाज तंबूत गेले. राजस्थानचा संपूर्ण संघ 18.1 षटकांत 136 धावांत माघारी गेला. जसप्रीत बुमराहनं ( 4/20) सर्वाधिक विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट व जेम्स पॅटिन्सन यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. मुंबई इंडियन्सनं हा सामना 57 धावांनी जिंकला. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies