IPL;2020 : रोहित शर्माने ने आयपीएल मध्ये केला ५००० धावांचा टप्पा पूर्ण

IPL;2020 : रोहित शर्माने ने आयपीएल मध्ये केला ५००० धावांचा टप्पा पूर्ण


 


IPL;2020 : रोहित शर्माने ने आयपीएल मध्ये केला ५००० धावांचा टप्पा पूर्ण


 
दुबई : आणखी एका भारतीय फलंदाजाची कमाल केली असून आयपीएल मध्ये त्याने ५००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलच्या तेराव्या हंगामात एका विक्रमाला गवसणी घातली. रोहित आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी रोहितला अवघ्या 2 धावांची गरज होती. त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात चौकार खेचत हा विक्रम नोंदवला.रोहितच्या आधी आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा बंगळुर चा कर्णधार विराट कोहली आणि सुरेश रैना या भारतीय खेळाडूंनी पार केला आहे. विराटने 180 तर रैनाने 193 सामन्यात 5 हजाराचा टप्पा पार केला. तर रोहितने 192 सामन्यात खेळताना हा विक्रम नोंदविला.
 • आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे दहा फलंदाज -
  विराट कोहली - 180 सामने, 5430 धावा
  सुरेश रैना - 193 सामने, 5368 धावा
  रोहित शर्मा - 192 सामने, 5000ङ धावा
  डेव्हिड वॉर्नर - 129 सामने, 4793 धावा
  शिखर धवन - 162 सामने, 4648 धावा
  एबी डिव्हिलियर्स - 157 सामने, 4529 धावा
  ख्रिस गेल - 125 सामने, 4484 धावा
  महेंद्रसिंह धोनी - 193 सामने, 4476 धावा
  रॉबिन उथप्पा - 180 सामने, 4427 धावा
  गौतम गंभीर - 154 सामने, 4217 धावा

 •  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments