पाकिस्तानच्या ISI संघटनेला माहिती पुरवल्यावरून HALचा कर्मचारी ताब्यात


 


पाकिस्तानच्या ISI संघटनेला माहिती पुरवल्यावरून HALचा कर्मचारी ताब्यातनाशिक : भारतीय बनावटीच्या विमानांची आणि त्या संबंधी गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेला पुरविणाऱ्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्याला राज्य दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या आहेत. एटीएसने नाशिकमध्ये ही कारवाई केली आहे.हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या नाशिक, ओझर येथील कारखान्यातील एक कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली. एटीएस प्रमुख देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि पोलिस उपायुक्त डॉ. विनायकुमार राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या व्यक्तीचा माग काढण्यास सुरुवात केली.हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा हा कर्मचारी आयएसआयला भारतीय बनावटीच्या विमानांची सर्व तांत्रिक माहिती आणि या विमान कारखान्यासह येथील प्रतिबंधीत क्षेत्राची सर्व गोपनीय माहिती पुरवत असल्याचे उघड झाले. अखेर एटीएसने या कर्मचाऱ्याला अटक केली असून, त्याच्याजवळून 03 मोबाईल, 05 सिमकार्ड आणि 02 मेमरी कार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती एटीएसकडून मिळाली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured