Type Here to Get Search Results !

आटपाडीतील १५ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


 


आटपाडीतील १५ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण



आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी मधील जवळपास १५ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत लोकल सेवा बंद असल्याने संपूर्ण ताण बेस्टवर पडत होता.



यासाठी राज्यातील मुख्य बस डेपोंमधून बसेस मागवण्यात आल्या होत्या. या राज्यातील अनेक एसटी कर्मचारी मुंबईत सेवा देत होते. एकूण ४२५ कर्मचारी हे बेस्टला मदत करण्यासाठी मुंबईला गेले होते. यापैकी १०६ जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनासमोर नवं आव्हान आहे. त्यामध्ये आटपाडी डेपोच्या ४३ कर्मचाऱ्यांचा ह्यात सहभाग आहे. सेवेचा कालावधी संपल्यानंतर कर्मचारी पुन्हा आपल्या जिल्ह्यात परतले असता त्यांची चाचणी करण्यात आली. ४३ कर्मचाऱ्यांपैकी १५ कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies